देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा लिरिक्स | Dehachi Tijori Bhaktichach Theva Lyrics

मराठी भजन “देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा लिरिक्स | Dehachi Tijori Bhaktichach Theva Lyrics” – सुधीर पढ़के जी के द्वारा गाया गया है। इस भजन के लिरिक्स, वीडियो के साथ निचे दिए गए है।


Dehachi Tijori Bhaktichach Theva Lyrics

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा ।
उघड दार देवा आता उघड दार देवा ।।

पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची,
मनी चोरट्याच्या का रे भिती चांदण्यांची,
सरावल्या हातांनाही कंप का सुटावा ।।

उजेडात होते पुण्य, अंधारात पाप,
ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप,
दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोक सेवा ।।

स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी,
आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी,
घडोघडी अपराध्यांचा तोल सावरावा ।।

तुझ्या हाती पांडुरंगा तिजोरी फुटावी,
मुक्तपणे भक्ती माझी तुझी तू लुटावी,
मार्ग तुझ्या राऊळाचा मला आकळावा ।।

भलेपणासाठी कोणी बुरेपणा केला,
बंधनात असुनी वेडा जगी मुक्त झाला,
आपुल्याच सौख्यालागी करील तो हेवा ।।

Dehachi Tijori Bhaktichach Theva Lyrics

Dehachi Tijori Bhaktichach Theva PDF


हमें उम्मीद है की भक्तो को यह मराठी भजन आर्टिकल “देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा लिरिक्स | Dehachi Tijori Bhaktichach Theva Lyrics” + Video +Audio बहुत पसंद आया होगा। “Dehachi Tijori Bhaktichach Theva Lyrics” भजन के बारे में आपके क्या विचार है वो हमे कमेंट करके अवश्य बताये।

सभी प्रकार के भजनो के lyrics + Video + Audio + PDF के लिए AllBhajanLyrics.com पर visit करे।

Leave a Comment

आरती : जय अम्बे गौरी