मराठी भजन “भक्त पुंडलिका साठी उभा राहिला विटेवरी लिरिक्स | Bhakt Pundalikasathi Ubha Rahila Vitevari Lyrics” – शकुंतला जाधव जी के द्वारा गाया गया है। इस भजन के लिरिक्स, वीडियो के साथ निचे दिए गए है।
Bhakt Pundalikasathi Ubha Rahila Vitevari Lyrics
भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी ।
धनी मलाही दाखवा ना विठूरायाची पंढरी ।।
।। तिथ नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी ।।
तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट,
आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट ।
भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी,
धनी मलाही दाखवा ना विठूरायाची पंढरी ।।
।। तिथ नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी ।।
एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली,
कान्होपात्राला देवान मंदिरात जागा दिली ।
संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी,
धनी मलाही दाखवा ना विठूरायाची पंढरी ।।
।। तिथ नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी ।।
सखुबाई जनाबाई मुक्ताबाई बहिणाबाई,
त्यांचे अभंग ऐकुनी मन आनंदित होई ।
हरी नामाच्या गजरात सुख मिळेल संसारी,
धनी मलाही दाखवा ना विठूरायाची पंढरी ।।
।। तिथ नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी ।।
भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी ।
धनी मलाही दाखवा विठूरायाची पंढरी ।।
।। तिथ नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी ।।
Bhakt Pundalikasathi Ubha Rahila Vitevari PDF
हमें उम्मीद है की भक्तो को यह मराठी भजन आर्टिकल “भक्त पुंडलिका साठी उभा राहिला विटेवरी लिरिक्स | Bhakt Pundalikasathi Ubha Rahila Vitevari Lyrics” + Video +Audio बहुत पसंद आया होगा। “Bhakt Pundalikasathi Ubha Rahila Vitevari Lyrics” भजन के बारे में आपके क्या विचार है वो हमे कमेंट करके अवश्य बताये।
सभी प्रकार के भजनो के lyrics + Video + Audio + PDF के लिए AllBhajanLyrics.com पर visit करे।