खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन लिरिक्स | Khandobachi Karbharin Zali Banu Dhangarin Lyrics

मराठी भजन “खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन लिरिक्स | Khandobachi Karbharin Zali Banu Dhangarin Lyrics – प्राची सुर्वे जी के द्वारा गाया गया है। इस भजन के लिरिक्स, वीडियो के साथ निचे दिए गए है।


Khandobachi Karbharin Zali Banu Dhangarin Lyrics

असा कसा हा देव येडा झाला पहा कशी नवलाई,
शिव अवतारी तुझीच पार्वती तीच हि बानू बाई ।
येळकोट येळकोट जय मल्हार,
सदानंदाचा विजय असो ।।

देव अधिपती कशी हरली त्याची मती,
एक मनात इच्छा होती कधी होईल अर्धांगिन ।
त्या खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन,
खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन ।।

जाऊन चंदनपुराला पाहतोय बानूच्या घराला,
भुरळ पडली येडा झाला देव भुलूनी कसा गेला ।
होता तिचा पण आला पूर्ण तो करून,
तिला घालून पैंजण म्हणे तुला मी सांभाळीन ।।

त्या खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन ।
खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन ।।

बानूला ठेउनी मनात जागुनिया दिनरात,
राहून साऱ्या धनगरात खातोय भातामध्ये ताक ।
ध्यास होता मनी तिला वाचनात गुंतुनी,
म्हणे होतो मी तुझा धनी जानी अंतरीच्या खुनी ।।

त्या खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन ।
खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन ।।

जोडा शंभू पार्वतीचा ठेवा पूर्व पुण्याईचा,
जोडा शंभू पार्वतीचा ठेवा पूर्व पुण्याईचा ।
योग जीवाशी शिवाचा देव खंडोबा नावाचा,
तोच आदीनाथ त्यांनी दावली जगी रीत ।।

तीच आली कलियुगात सांगे साऱ्याला चंदन ।
खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन ।।

देव अधिपती कशी हरली त्याची मती,
एक मनात इच्छा होती कधी होईल अर्धांगिन ।
त्या खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन,
खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन ।।

Khandobachi Karbharin Zali Banu Dhangarin Lyrics

Khandobachi Karbharin Zali Banu Dhangarin PDF


हमें उम्मीद है की भक्तो को यह मराठी भजन आर्टिकल खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन लिरिक्स | Khandobachi Karbharin Zali Banu Dhangarin Lyrics” + Video +Audio बहुत पसंद आया होगा। “खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन लिरिक्स” भजन के बारे में आपके क्या विचार है वो हमे कमेंट करके अवश्य बताये।

सभी प्रकार के भजनो के lyrics + Video + Audio + PDF के लिए AllBhajanLyrics.com पर visit करे।

Leave a Comment

आरती : जय अम्बे गौरी