Utha Utha Swami Samartha Lyrics
उठा उठा स्वामी समर्था
ओवाळीतो पंचारती
पंचप्राण घेऊनी आलो स्वामींच्या चरणी
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
परब्रम्ह आज आले भक्तांच्या सामोरी
मठात या येतो आम्ही नित्य गुरुवारी
हरपले देह भान लागले ते ध्यान
शरण रे आम्ही आलो,नेत्र पाणावले
पंचप्राण घेऊनी आलो स्वामीच्या चरणी
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
जगाच्या कल्याणासाठी संतांची विभुती
स्वामी समर्थांच्या पायी येतसे प्रचीती
पुजेसाठी नाही काही, फक्त जीव भोळा
पामर या भक्तांसाठी स्वामी कृपा होते
पंचप्राण घेऊनी आलो स्वामींच्या चरणी
देह आज विरूनी गेला स्वामी तुम्हा पुढती
मुर्तीमंत पाहे मी जगन्नाथ मूर्ती
मागणे हे सरले ध्यान लागताना
स्वामी समर्थांच्या पायी, स्वर्ग सात येती
पंचप्राण घेऊनी आलो,स्वामींच्या चरणी
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ