Pandhari Sadi Nesun Buddha Pujela Basav Lyrics
धम्माचे तत्व बाई तुला ग माहित असावं
पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं।। धृ ।।
दोन्ही गुडघे टेकून खाली मस्तक नामवावं
बुद्धचरणी हात जोडुनी तृष्णेला शमवावं
दोन्ही गुडघे टेकून खाली मस्तक नामवावं
बुद्धचरणी हात जोडुनी तृष्णेला शमवावं
धम्माचे महत्व बोधिसत्व मनात ठसाव
पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं।। १ ।।
प्रतीक स्वच्छ सुंदर असत धम्म संघात
मार्गदर्शन पावन करत सभ्यतेच्या रंगात
मनातले जे असाल काळ त्यांनीच पुसाव
पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं।। २ ।।
भीम बुद्ध जयंती सण मानती बुद्धजन
शुभ्र वस्त्राला ग बाई आहे बहुमान
हरिनंदाला ह्या जनतेला हे लेन दिसावं
पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं।। ३ ।।
धम्माचे तत्व बाई तुला ग माहित असावं
पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं।। धृ ।।